राजगुरु सेनाजी महाराज
संत सेना महाराज यांना राजगुरु सेनाजी म्हणून मान्यता प्राप्त.
१) राणाजीनी गुरु केल्याचा उल्लेख प्रिय दासांनी आपल्या भक्तमाळ या ग्रंथावरील टिकेत केला आहे. भक्तमाळ हा ग्रंथ श्री नाथाजी महाराज (श्री नारायणदासजी ) यांनी लिहिला. प्रियदासनी भक्तमाळ वर सवंत १७६९ (इ. स १७१३ ) मधे टिका लिहिली. त्यात ते म्हणतात बांधवगड नरेशाचे वंशज सेनजींच्या वंशजास आपले गुरु मानत.

इ.स. १३०१ मधे सेनाजी जन्मले, त्यानंतर वयाच्या ४० - ४२ व्या वर्षी बांधवगड नरेशानी त्यांना गुरु करुण घेतले. म्हणजे सेनाजींचे घराणे इ. स. १३४२ - ४३ ते १७१३ पर्यन्त म्हणजे साडे तीनशे हुन अधिक वर्षे राजगुरु म्हणून होते. प्रभु भक्तीची शक्ति प्राप्त झाल्यावर अध्यातमाची अभिव्यक्ति होणे हे स्वाभाविकच होय. सेनाजी मुळे त्यांच्या घराण्यास राजगुरुची इतमामाची जागा मिळाली. त्यामध्ये सेनाजींच्या भक्तीची शक्ती दिसून येते.
२) सेना महाराजांचे दुसरे ग्रंथकार लेखक श्री कुकसाहेबांनी आपल्या The caster and tribes of N. W. P. buth या ग्रंथात सेनाजींच्या राजगुरुत्वा बद्दल मान्यता दर्शविली आहे.
२) सेना महाराजांचे दुसरे ग्रंथकार लेखक श्री कुकसाहेबांनी आपल्या The caster and tribes of N. W. P. buth या ग्रंथात सेनाजींच्या राजगुरुत्वा बद्दल मान्यता दर्शविली आहे.
त्याचप्रमाणे प्रोफेसर विलसन, भारतधर्म मंडळाचे महा - उपदेशक पं. ज्वालाप्रसादजी मिश्र यांच्यासह अनेक ग्रंथकारांनी आपापल्या ग्रंथात श्री सेनाजींच्या राजगुरुत्वाचा उल्लेख केला आहे.