सेनाजींनी केलेला प्रवास आणि महाराष्ट्र दर्शन | Biography Of Sant Sena Maharaj
![]() |
सेनाजींनी केलेला प्रवास आणि महाराष्ट्र दर्शन |
संत सेना महाराज महाराष्ट्र दर्शन
सांप्रदायाच्या प्रचारार्थ सेनाजींनी बराच प्रवास केलेला होता असे दिसते. बनारस पासून आळंदी, पंढरपूर, त्रयंबकेश्वर, सासवड इ भागवत धर्मतीर्थास भेटी दिल्याचे त्यांच्या अभंगावरून आढळते.
सेनाजींना महाराष्ट्रातील पांडुरंगाची महती काही संतांकडून समजली होती तेव्हा त्या दोन्ही कर कटेवरी ठेवून विटेवर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी देवींच्या दर्शनाची आस त्यांना लागली होती. तसे त्यांना राजा वीरसिंह, आपले कुटुंबीय आणि शिष्यासमोर इच्छा व्यक्त केली आणि महाराष्ट्र प्रवासास निघाले. राजा वीरसिंह आपल्या परिवारासोबत बांधवगडच्या सीमेपर्यंत श्री सेनाजींना निरोप देण्यासाठी आला.
कथा किर्तेने करीत श्री सेना महाराज मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात उतरले संत सेनाजी बरोबर त्यांच्या सुविध पत्नी सौ सुंदराबाई त्यांची मुले, सेनाजींचे शिष्य आणि राजा वीरसिंहाचे खास सेवक आणि भक्त गण त्यांचे सोबत होते. सेनाजींना प्रवास सुलभ व्हावा आणि प्रवासात अडचणी येऊ नयेत यासाठी राजा वीरसिहानी ठिकठिकाणच्या राजा महाराजांना पत्राची थैली व सेना महाराजांची माहिती सोबत दिलेली होती.
ते पंढरपुरास आले तेथे त्यांनी पांडुरंगाचे आणि रुक्मिणी देवीचे मनोभावे दर्शन घेतले, पंढरपुरात त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले अनेक संत महात्म्यांची ओळख करून घेतली. परभाव विसरून परस्परांच्या चरणास वंदन करणाऱ्या वारकरी सांप्रदायास पाहून त्यांना कृतार्थ वाटले. आनंदाने बेभान होवून कीर्तन रंगी नाचणारी संतमंडळी पाहिल्यावर त्यांचे अंतःकरण उचंबळून आले. धार्मिक व सामाजिक समतेचा ह्दयगम अविष्कार त्यांनी पंढरपूरच्या वाळवंटात अनुभवला.
आळंदिला जावून त्यांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वरास जावून सोपानदेवांच्या समाधीस मिठी मारली. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या आणि त्या - त्या समयी त्यांच्या मुखातून रसाळ अभंग प्रकट झाले. बरिचवर्षे सेनाजी महाराष्ट्रात राहिले. इथली मराठी भाषा अवगत केली आणि मराठी भाषेत तीर्थक्षेत्राचे महात्म्य सांगणारी, सामाजिक विषमतेवर आघात करणारी, सामाजिक समतेचा संदेश देणारी अनेक अभंग रचना त्यांनी केली आणि उतारवयात त्यांनी महाराष्ट्राचा निरोप घेतला.
आळंदी माहात्म्य
कृपा उपजली पंडुरंगासी। वर दिधला ज्ञानदेवासी। सकळतीर्थ आळकापुरासी। इंद्रिनीसी मिळती येऊनी।
तेथे करीता नित्य स्नान। नेईन वैकुंठासी जाण। सत्य सत्य तुझीच आण। सापूज्य सदना देईन तया।
आळकांपुरी नामवाचे। जो घेइल ज्ञानदेवांचे तयाठाने वैंकुठीचे। वंदीन तयाचे चरणरज।
आणि ऐके ज्ञानदेवा। जो करील नित्यसेवा। तो माझा प्राण विसावा। सत्य जीवा आवडता।
पंढरपुर माहात्म्य
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताची। वाट धरिता पंढरीची। चिंता हरे संसाराची। ऐसी कीढ़े नसेपायी। धुंडिता ब्रम्हांड पाही। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताची। या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी। पाहिली शोधोनी अवघि तीर्थे। ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार। ऐसे वैष्णव डिंगरा दावा कोठे। ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक। ऐसा वेणुनादी। काळा दावा। ऐसा विटेवरी उभा कटेवरि कर। ऐसा पाहता निर्धार नाही कोठे। सेना म्हणे खुण। सांगितली संती। या परती विश्रांती न मिळे जीवा।
त्र्यंबकेश्वर महात्म्य
पुण्यभूमि गंगातीरी। मागे ब्रम्हागिरी शोभत। येथे नांदले निवृत्ती निधान। त्याचेनि ठाव हा पुण्यपावन। जीवा उध्दरणा म्हणता निवृत्ती। तो हा निवृत्तीनाथ निर्धारी। स्मरता तरती नरनारी। सेना म्हणे श्रीशंकरी। ऐसे निर्धारी सांगितले। सेना म्हणे भाळी चंद्र धरियेला। नमस्कार माझा तया आदिनाथाला। सिद्धामाजी अग्रगणी। तो हा भोळा शूळपाणी। धन्य धन्य त्रिंबक राजा। तया नमस्कार माझा। जटी गंगावाहे। तो हा त्रिगुणात्मक पाहे। भोवती वेढा ब्रम्हगिरी। मध्ये शोभे त्रिपुरारी। सेना घाली लोटांगण। उभा राहे करजोडून।
अशा रीतीने संत सेना महाराजांनी महाराष्ट्रातल्या तीर्थक्षेत्रांच्या वर्णनपर अभंग रचलेल्या आहेत.