संत सेना महाराज यांचा वारकरी सांप्रदाय
![]() |
सेना सांप्रदाय |
संत सेना महाराज यांचा वारकरी सांप्रदाय -
श्री. एच विल्यम हे हिंदू रिलिजन्स या ग्रंथात म्हणतात सेना नाभिक हे रामानंदांच्या शिष्यापैकी तिसरे शिष्य होते, त्यांनी एक स्वतंत्र सांप्रदाय स्थापन केला. त्या सांप्रदायाचे आणि संस्थापकाचे नाव हल्ली नाममात्र आहे.
संत कबीर व सेनाजींनी आपापले स्वतंत्र सांप्रदाय स्थापिले. कबीर सांप्रदायास कबीर पंथ व सेनाजींच्या सांप्रदायास सेनापंथ (senisut willium ) म्हणत असत. स्वतंत्र सांप्रदाय स्थापण्यात सेनाजींची स्वतंत्र बुद्धी दिसून येते.
सेना महाराजांनी आपला सांप्रदाय काशी येथे सुरु केला. काशीच्या ज्या भागात सेनाजींचे वास्तव्य होते तो भाग सेनपुरा मोहल्ला या नावाने हल्ली प्रसिद्ध आहे. काशी म्हणजे पंडितांचे माहेरघर समजले जाते. तेथील धर्मनिर्णय भारतातील प्रत्येक हिंदू प्रमाण मानतो. अशा या श्रेष्ठ धर्मपीठामध्ये आपला नवीन सांप्रदाय स्थापन करणाऱ्या श्री सेनाजींच्या विभूतिमत्वाचे शास्त्र अभ्यासाचे, बुद्धीचे, महान विद्वत्तेचे दर्शन होते, सीएनजी महाराज हे संतसेनेचे सेनापती होते या शंका नाही.
या सांप्रदायाचा प्रसार उत्तर हिंदुस्थान, मध्य हिंदुस्थान, मारवाड, पंजाब, गुजरात, काशीपासून जगन्नाथ पुरीपर्यंत झाला आहे.
सांप्रदायाची तत्वे अभंगातून व्यक्त झाली आहेत. विठ्ठल भक्ती सद्धर्माचरण, कर्तव्यकर्म, दक्षता, परधन - स्त्री वर्जन , धर्म जात - वर्ग व जातीभेद न मानता सर्वत्र समानत्व हि या सांप्रदायाची प्रमुख लक्षणे दिसतात.