गोमातेच्या दुधाप्रमाणे सेना महाराज हे गोरया वर्णाचे होते. राजपूत भाषेत दुधास सेनो असे म्हणतात म्हणून त्यांचे नाव सेनो असे ठेवण्यात आले. पुढे सेनो मोठे झाल्यावर सेनोजी आणि महाराष्ट्रात भक्ती मार्गाचा प्रसार करताना, पांडुरंगाच्या सानिध्यात आल्यानंतर सेनोजीनचे सेनाजी असे नामकरण झाले. आजही उत्तर भारतात संत सेना महाराजांना सेनजी असे संबोधले जाते.
जन्मस्थळ
सयुंक्त बुंदेल खंडात रेवा नावाचे संस्थान आहे. बांधवगड त्या संस्थानची राजधानी आहे. लोहमार्गाच्या इलाहाबाद जबलपुर फाट्यावर कटनी नावाचे लोहमार्गाचे बहुमार्गी स्थानक आहे. तेथून विलासपुरला एक लोहमार्ग फाटा गेलेला आहे. त्या फाट्यावर उमरिया नावाचे स्थानक आहे. त्या स्थानकापासून ईशानेस १८ मैलावर बांधवगड किल्ला आहे. मधला भाग डोंगराळ व दलदलीचा आहे. तेथे श्री संत सेना महाराजांचा जन्म झाला.